प्रहारचे अध्यक्ष आणि शिवसेनेत प्रवेश केलेले बच्चू कडू यांनी त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर किल्ले रायगडावर येत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले आहे. माझा प्रवेश हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने राज्यातील सर्व समाजाच्या घटकांना न्याय कसा देता येईल यासाठी काम करणार असल्याची शपथ त्यांनी यावेळी घेतली. जनतेपर्यंत पुढे अनेक गोष्टी शिकून पुढचा प्रवास असणार आहे अस ते म्हणालेत. स्वराज्य ज्यांच्या विचारांनी मजबूत झालं त्यांचा विचार घेऊनच आता काम करणार अस कडू म्हणाले.