बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा नववा दिवस असून आज सलोना ते चिखलदरा त्रिशूल तांडव मोर्चा आहे. बच्चू कडू यांचा सरकारला दुपारी चार वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आहे. सरकारला चार वाजेपर्यंत आमचा वेळ आहे, त्यानंतर आमचं आंदोलन कुठल्याही स्तरावर जाऊ शकतं, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.