बदलापूर येथील भाजप नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्या एका मतदाराला जाब विचारताना दिसत आहेत. मतदानाला यायचं नव्हतं तर पैसे का घेतले, असा थेट सवाल त्यांनी मतदाराला केला. २० हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारावरून ही चर्चा घडल्याचे दिसत आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.