बदलापूर येथील स्त्री बीज तस्करी प्रकरणाला आता जळगावचे कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणी सातव्या आरोपीला अटक करण्यात आली असून, तो जळगावातून बनावट आधार कार्ड बनवण्याचे काम करत होता. या अटकेमुळे प्रकरणाला नवी दिशा मिळाली असून, स्त्री बीज तस्करीच्या या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.