बदलापूर शहरात आज सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली. वाढत्या तापमानानंतर आलेल्या या पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.