जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामात लागवड केलेल्या कोवळ्या पिकांच्या अंतरमशागती सुरू आहे. मात्र अशातच वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. लागवड केलेल्या कोवळ्या पिकांवर पहाटे आणि मध्यरात्रीच्या सुमारास ताव मारून ही पिके फस्त करत आहे.त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार लागवड करावी लागली.