सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या कामेरी इथं भैरवनाथ देवाची यात्रा मोठा उत्साहात संपन्न झाली आहे. यात्रेनिमित्ताने बगाड मिरवणूक पार पडली. गावातील मुख्य रस्त्यावरून भवानी पेठ ते हनुमान मंदिरापर्यंत पारंपारिक वाद्यांच्या आणि भैरवनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत, मोठ्या भक्तीभावाने बगाड मिरवणूक निघाली.