बदलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी बागेश्वर बाबाचे पोस्टर पायदळी तुडवत निषेध केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा बागेश्वर बाबा हा भोंदू बाबा आहे. कडेलोट हीच त्याला शिक्षा असू शकते अशा शब्दात देशमुख यांनी निषेध केलाय.