तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात पुन्हा एकदा बाहुबली टस्कर हत्तीने एण्ट्री घेतली आहे. चंदगड तालुक्यात वावरत असलेला बाहुबली तिलारी खोऱ्यात दाखल झाला. एका आंबा बागेत घुसून या बाहुबली हत्तीने जमिनीतील माती सोंडेत उचलून अंगावर उधळत बराच वेळ धुडगूस घातला. त्याचा हा आक्रमक आविर्भाव पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.