राष्ट्रीय नेते माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब आपटे स्मृती समिती आणि लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजगुरूनगर शहरातून भव्य ग्रंथ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील अनेक वारकऱ्यांनी आणि महिलांनी सहभाग घेतला. सध्या दिंडी सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.