काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, मंत्रालयातील एखाद्या पीएने निवडणूक कार्यक्रम तयार केला असून, अनुभवी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तो केवळ जाहीर केला आहे. थोरात यांचा हा आरोप आगामी निवडणुकांच्या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.