काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीमध्ये गोंधळाची स्थिती असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या धोरणांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. राजकारणात गटबाजी वाढून पर्यायांची संख्या वाढल्याने महाराष्ट्राचे राजकारण विस्कळीत झाल्याचे थोरात यांनी नमूद केले.