बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणात न्यायाधीश अचानक बदलले आहेत. आरोपी निसार खत्रीने न्यायाधीशांना बदलण्याची मागणी ठाणे कोर्टाने फेटाळली होती. मात्र, आता प्रशासकीय आदेशाद्वारे न्यायाधीश बदलल्याने चर्चांना उधाण आले आहे. करोडो रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपीवर सरकार मेहेरबान आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.