दोन दिवसांपासून रावेर, यावल तालुक्यात तापमानात मोठी घट झाली आहे. तापमान 11 ते 8 सेल्सिअसपर्यंत खाली गेला आहे. कडाक्याच्या थंडीचा थेट फटका केळी उत्पादकाला बसला आहे. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर चरका, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.