मुक्ताईनगरच्या अंतुर्ली, इच्छापुर परिसरात दुसऱ्यांदा वादळाचा आणि पावसाचा फटका पिकांना बसला आहे. इथलं केळीचं पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.