आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा मोठा फटका उत्तर पुणे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून 1700 एकर वरील केळीच पिक धोक्यात आले आहे. केळी पिकाची निर्यातच थांबल्याने केळीचे बाजार भाव हे गडगडले आहेत. 20 ते 22 रुपये किलोने विकली जाणारी निर्यात केली जाणारी केळी आज 7 ते 8 रुपये किलोने सुद्धा कोणी व्यापारी तयार नाहीत. त्यामुळे परिणामी काढणी साठी आलेली केळी शेतातच पडून असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.