जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही दुष्काळाचा मोठा फटका बसत आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी केळीच्या बागा करपू लागल्या आहेत. पावसाअभावी केळीच्या वाढीवर परिणाम झाला असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. आधीच केळीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.