परभणी मध्ये तापमान 43 अंशांच्या वर गेले आणि त्यामुळे वाढत्या उन्हाचा फटका हा केळीच्या बागांना देखील बसताना दिसत आहे.वाढत्या उन्हामुळे झाडाला लागलेली केळीचे फळे काळी पडत असून, उन्हामुळे केळीच्या झाडातीलतील पाणी कमी होऊन केळीचे खांब जमिनीवर कोसळत आहेत त्यामुळे याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.