पराभणी जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्या मुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या शेकडो एकर वरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.