वर्ध्यातील पवनार शिवारात केळीच्या बागेचं आगीमध्ये नुकसान झालं. शेतकऱ्याचं सुमारे एक ते दीड लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. या घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे. शेतीलगत काडीकचरा जाळण्यात येत असताना आग लागल्याचा अंदाज आहे.