अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा, सुनगाव, जामोद, जळगाव परिसरातील केळीसह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. अवघ्या एक तासाच्या वादळाच्या थैमानात केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने परिसरातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.