अमेरिका आणि इराण युद्धामुळे निर्यातक्षम केळी उत्पादकांना फटका बसला आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे केळीचे कंटेनर करमाळयात परत यायला सुरुवात झाली आहे. जवळपास 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत. आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातक्षम केळीचे जहाजावरील कंटेनर माघारी यायला सुरुवात झाली आहे.