बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील वाढत्या अत्याचारांमुळे जनभावना तीव्र झाल्या आहेत. परळीत सकल हिंदू समाजाने या अत्याचारांविरोधात जोरदार निदर्शने केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांगलादेशचा झेंडा जाळून निषेध नोंदवला. 'भारत माता की जय' आणि 'बांगलादेश मुर्दाबाद' अशा घोषणा देत हिंदू समाजातील रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.