अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल लवकरच अपेक्षित आहे. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाऊनलोड झाला असून, कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरला उष्णतेमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे तो परदेशातील तज्ञांकडे दुरुस्तीसाठी पाठवला जाण्याची शक्यता आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने चौकशी पूर्ण होईपर्यंत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.