जय पवार गावपेट दौऱ्यानिमित्त खांडज येथे गेले असता,एका कार्यकर्त्याने खास गुलाबी रंगाची दुचाकी तयार केली होती. त्या दुचाकीवर बसण्याचा आग्रह कार्यकर्त्याने केला असता, जय पवार यांनी त्याचा मान राखत आनंदाने त्या दुचाकीवर बसण्यास होकार दिला. दुचाकीवर बसताना “पाडू नको बरं” असे कार्यकर्त्याला म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.