जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एन्व्हार्यरमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि बारामती हेल्थ क्लब आणि बारामती सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि सायकल वापराला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.