बारामती तालुक्यातील मौजे खांडज परिसरामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून बिबट्याचा प्रचंड वावर सुरू असूनही सुस्त वनविभाग आणि प्रशासन मात्र पूर्णपणे मुग गिळून गप्प बसले आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार आणि निष्क्रिय वनविभागाचा तीव्र निषेध करण्यासाठी आज सोमवार, दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय भवन, बारामती येथे खांडजच्या संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ऐतिहासिक ठिया आंदोलन छेडले आहे.