संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले आहे.या दरम्यान नीरा नदीमध्ये दत्त घाटावर माऊलीच्या पादुकांना स्नान घालण्यात आले हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी भाविक नीरा नदीच्या तीरावर विसावले आहेत. यातील काही क्षण ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आले आहेत.