शीतल तेजवानीला घेऊन बावधन पोलीस पिंपरीतील तिच्या ऑफिसला पोहचले होते. मात्र ऑफिसची झाडाझडती न घेताचं पोलीस अवघ्या दोन मिनिटांतच परतले. त्यामुळं बावधन पोलिसांच्या कारवाईचा फार्स पुन्हा एकदा पहायला मिळाला. पिंपरी चिंचवड पालिकेच्या समोर शीतलचे पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर हे ऑफिस आहे. इथल्या पत्त्याचा वापर करुन तिने पॉवर ऑफ अटर्णी बनवलेली आहे.