बुलढाणा शहराला लागूनच ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात अस्वल बिबट यासारखे अनेक प्राणी वास्तव्यास असतात. त्यामुळे बऱ्याचदा या वन्य प्राण्यांचा शहर परिसरात वावर पाहायला मिळतो. बुलढाणा शहरातील बालाजी नगर म्हाडा कॉलनी परिसरामध्ये अस्वल मुक्त संचार करत असल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसापूर्वी तब्बल चार बिबट म्हाडा कॉलनी परिसरात दिसून आले होते. स्थानिकांनी खबरदारी राखावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे..