सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असणाऱ्या म्हसवड येथे पार पडत असलेल्या नागोबा यात्रेत गजीनृत्य आणि पारंरारिक धनगरी ओव्यांचा कार्यक्रमांनी यात्रेत मोठा उत्साह निर्माण केल्याचे दिसून आले. माणदेशी भूषण म्हणून प्रसिद्ध असलेला गजीनृत्यांचा खेळ हा नागोबा यात्रेचे मुख्य आकर्षण असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील 50 गावातील गजीमंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ढोलांचा गजर आणि बेभान होऊन नृत्य करणारे धनगर समाजाचे भाविक यांचा नयनरम्य अविष्कार यावेळी माणवासियांनी अनुभवला. नागोबा यात्रेसाठी महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.