उन्हाळी सुट्या , अधिक मासातील शेवटचा गुरुवार असल्याने शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. राज्यातूनच नव्हे तर देशभरातून काल सायंकाळ पासूनच शेगावात संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविक हे येत आहेत. आज सकाळपासूनच लाखो भाविक शेगावात दाखल झालेले आहेत.