वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिक थंड पेयांकडे वळताना दिसत आहेत. पारंपरिक आणि नैसर्गिक पेय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाच्या रसाला शहरात मोठी मागणी वाढली आहे. वाशिम शहरातील विविध भागांतील रसवंतीगृहांवर दिवसभर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.