सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा गावात मात्र दुष्काळामुळे दिवाळीचा आनंदच हरवला आहे. गावातील विहिरी, हातपंप आणि बोअरवेल कोरडे पडल्याने ऐन सणासुदीच्या काळात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. घराघरांत ना रांगोळी, ना पणत्या, ना आकाशकंदील. तर दुसरीकडे चिमुकल्यांना दिवाळीत चटणी-भाकरी खाण्याची वेळ आली आहे.