आष्टी तालुक्यातील कडा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मैलाली बाबा यांच्या वार्षिक यात्रा उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या 'संदल' मिरवणुकीला गावचे सरपंच युवराज पाटील यांच्या हस्ते देवाच्या घोड्याला मानाची चादर अर्पण करून मोठ्या थाटात प्रारंभ करण्यात आला.