बीड जिल्ह्यातील प्रिंपरी आष्टी येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चैतन्य मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न झाली. एकाच पालखीतून निघालेली मिरवणूक आणि भव्य फटाक्यांची आतशबाजी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.