आष्टी तालुक्यातील श्री. क्षेत्र कासारी येथील महान तपोनिधी श्री शिवस्वरूप बन महाराज यांच्या 48 वा समाधी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. आज सातव्या दिवशी शिवस्वरूप बन महाराज यांच्या पालखीची भव्य मिरवणूक कासारी येथे संपन्न झाली, यावेळी शेकडो महिलांनी गळ्यात टाळ घेऊन पाऊली खेळत विठ्ठलाच्या नामाचा गरज करत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला आहे.