संजीवनी समाधीला वर्षभरातून एकदाच नाथ भक्तांना समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येत आहे. यावेळी संजीवनी समाधीला चंदनाचा लेप जलअभिषेक करण्यात येतो. 45 एकरामध्ये दर्शनासाठी रांगेची जय्यत तयारी सुरु असून गडावर विद्युत रोषणाई केली आहे. तसेच भाविकांना स्नान करण्यासाठी शेकडो शॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे. 18 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता कावडीच्या पाण्याने समाधीवर जल अभिषेक होणार आहे. 19 मार्च रोजी गुढीपाडव्याला सकाळी 6 वाजता या समाधी दर्शन सोहळ्याची सांगता होणार आहे.