बीड जिल्ह्यातील बाळापूर येथे फिरंगी आई देवी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगल पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेने आयोजित केलेल्या या दंगलीत पैलवान ज्ञानेश्वर साळुंखे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांना नवी कोरी बुलेट बक्षीस म्हणून देण्यात आली.