बीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाल्यासह वांग्याचे भाव घसरले आहेत.वांग्याला केवळ चार ते पाच रुपये किलो दर मिळत असल्याने, शेतकरी अनेक दिवसांपासून भाववाढ होईल या प्रतीक्षेत होते.मात्र आता वांगी शेतातच खराब होऊ लागले आहेत.परिणामी शेतकऱ्यांवर ही वांगी फेकून देण्याची वेळ आली आहे.बीडच्या पुरुषोत्तमपूर येथील एका शेतकऱ्याचे तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च झाले. मात्र एक रुपयाचे उत्पन्न मिळालेले नाही. व्यापारी 50 - 60 रुपये किलोने विक्री करतात, मात्र खरेदी करताना शेतकऱ्यांना चार ते पाच रुपयांचा भाव देतात हे चुकीचे धोरण आहे ते बदलले पाहिजे अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्याने दिली आहे.