अहिल्यानगर आणि बीडच्या सीमेवर असलेल्या सावरगाव येथे मच्छिंद्रनाथ गडावर दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सावरगाव येथे नाथपंथातील मच्छिंद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे, वर्षातून केवळ एक वेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी असलेल्या अमावस्येला मच्छिंद्रनाथाचे समाधीला हात लावून दर्शन घेतलं जातं, हा दर्शन सोहळा थोडा वेगळा आहे.