बीड नगरपरिषद निवडणुकीत आरती बनसोडे यांच्या विजयानंतर शेजारील व्यक्तीने त्यांच्या दिरावर कोयत्याने हल्ला केला. 'भावजय नगरसेवक कशी काय झाली' असे म्हणत आरोपीने दुचाकींची तोडफोड केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.