बीडच्या गेवराई आणि जालन्याच्या अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावातील ग्रामपंचायतींनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून नदीत पाणी सोडले जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती वर्तवली जात आहे.