बीडच्या परळीमध्ये स्ट्राँग रूम बाहेर राडा झाल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व स्ट्रॉंग रूमच्या परिसराचा आढावा घेऊन आवश्यक असेल तिथे दुप्पट सुरक्षा देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यानंतर परळी, गेवराई, माजलगाव आणि बीड येथे दुप्पट सुरक्षा देण्यात आलेली आहे. सुरक्षा वाढवल्यानंतर बीड येथील स्ट्राँग रूमच्या बाहेर आता चोहोबाजूने लोखंडी बॅरिगेटिंग करण्यात आली आहे.