बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथील जैन मंदिरात मोठी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे व कपाटे तोडून काही पितळी मूर्ती लंपास केल्या आहेत. दानपेटी फोडण्याचा प्रयत्न फसला असला तरी, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.