बीड : खामगाव-पंढरपूर महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव दरम्यानच्या सिमेंट रस्त्यावर मोठ-मोठ्या लांबच लांब भेगा पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्याचा काही भाग खोलवर खचला आहे. पडलेल्या भेगांमध्ये वाहनांचे टायर अडकत असल्याने अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्यावर वारंवार भीषण अपघात घडत असून अनेकांचे बळी गेले आहेत. त्वरित या रस्त्याचा प्रश्न प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मार्गी लावावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.