बीडमध्ये आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झालेली दिसून आली.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात आज जेलभरो आंदोलन करण्यात आलंय. पिक विमा, कर्जमाफी, ऊसतोड मजुरांचा त्रिपक्षीय करार, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा यासह विविध मागण्या यावेळी किसान सभेने केल्यात.या जेलभरो आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी आणि किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत सरकार विरुद्धचा आपला रोष व्यक्त केलाय.