बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा येथील सरस्वती नदी जोरदार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे परिसरातील विहिरी-बोअरवेलची पाणीपातळी वाढल्याने अनेक महिन्यांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुटला आहे.