बीडच्या श्री क्षेत्र नारायण गडाचा 75 वा नारळी सप्ताह गेवराई तालुक्यातील उमापूर येथे सुरू आहे. काल रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने तेथे उभारलेल्या मंडपासह साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भाविक भक्तांची देखील धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने कोणालाही हानी झाली नाही.