बीड - प्राणीमित्र परमेश्वर घोडके यांनी विहीरीत पडलेल्या साळींदर प्राण्याला जिवदान दिले आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील सुलेमान जवळा-अंभोरा शिवारातील एका विहीरीत साळींदर प्राणी पडला होता. त्याला दोरीने सहाय्याने बाहेर काढत प्राणी मित्र परमेश्वर घोडके यांनी त्याला जिवदान दिले.